प्रधानमंत्री आवास योजना (PMAY): 2022 पर्यंत सर्वांसाठी घर

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY): सर्वांसाठी घर

Home Loans Made Easy!

Home » Articles » प्रधानमंत्री आवास योजना (PMAY): सर्वांसाठी घर

प्रधान मंत्री आवास योजना (PMAY) मिशन ची 25 जून 2015 पासून अंमलबजावणी सुरू झाली ज्यामध्ये सर्वांसाठी घर देण्याची योजना होती. हे मिशन सर्वांना आणि प्रत्येक पात्र कुटुंब/प्राप्त कर्त्यांना घर देण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेश (युटीज) आणि केंद्रीय मध्यवर्ती एजंसीज (सीएनएज) द्वारे कार्यकारी कार्यालयांना केंद्रीय सहाय्य पुरवते. याला “2022 पर्यंत सर्वांसाठी आवास” म्हणूनही संदर्भित केले जाते, या क्रेडीट-लिंक्ड PMAY अनुदान योजना (CLSS) ने विशिष्ट आर्थिक विभागांशी संबंधित भारतीयांसाठी 2 कोटी घरे बांधण्याचे ध्येय ठेवले आहे. जे व्यक्ती रहिवासी मालमत्ता किंवा जमीन खरेदी कराण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी कर्ज मिळवू इच्छित अहेत ते अशा क्रेडीटवर व्याजामधील अनुदानास पात्र असतील. तरीही, कर्ज व्याज अनुदान हे आर्थिकरित्या कमकुवत विभाग (EWS), कमी उत्पन्न गट (LIG) किंवा मध्यम उत्पन्न गट (MIG) यांच्याशी संबंधित लोकांसाठी उपलब्ध असेल. PMAY नियमांनुसार, आर्थिकरित्या कमकुवत विभागातील (EWS) लोकांसाठी घराचा आकार हा 30 चौ मीटर कव्हर क्षेत्र असू शकतो, तरीही राज्य/केंद्रशासित प्रदेशामध्ये मंत्रालयाचा सल्ला आणि मंजूरीने घरांचा आकार विस्तारण्यास लवचिकता असेल.

PMAY ची वैशिष्ट्ये

खाली PMAY ची मुख्य वैशिष्ट्य़े दिली आहेत:

 1. जर लाभार्थ्यांनी गृह कर्जाचा वीस वर्षांचा कालावधी निवडला तर व्याज दर हा वर्षाला 6.50% अशा अनुदानित दरामध्ये पुरवला जातो.
 2. गॄह कर्जावर मध्यम उत्पन्न गट (MIG) ला घरांचे संपादन/बांधकामासाठी (पुनर्खरेदीसह) व्याजामधील अनुदान पुरवले जाते.
 3. आर्थिकरित्या कमकुवत विभाग (EWS)/कमी उत्पन्न गट (LIG) साठी,  घराचे बांधकाम आणि संपादनासाठी व्याज अनुदानीत दर पुरवला जातो. विद्यमान घरांमध्ये खोल्या, स्वयंपाक घर इ. समाविष्ट करण्यासाठी घेतलेल्या गृह कर्जावर व्याज अनुदान पुरवले जाते.
 4. या प्रधान मंत्री आवाज योजनेंतर्गत, 500 वर्ग I शहरांना प्राधान्य देऊन 4041 नियामक नगरांचे वैशिष्ट्य असलेल्या भारतामधील सर्व शहरी क्षेत्रांचा समावेश होतो.
 5. बांधकामासाठी पर्यावरणास अनुकूल आणि शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
 6. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी, तळ मजला वाटपास प्राधान्य दिले जाते.

PMAY चे लाभ:

PMAY चे मुख्य लाभ खालीलप्रमाणे आहेत:

 1. PMAY अनुदान: PMAY च्या सर्वांत मोठ्या लाभांपैकी एक म्हणजे अनुदानाचा दर. सामान्यत: गृह कर्जांसाठीचा व्याज दर हे काहीसे 10% इतके असतात आणि PMAY योजनेसह, व्यक्तीला 6.5% अनुदान दिले जाते. हे अप्रत्यक्षपणे व्यक्तीने द्यायचे मासिक हप्ते कमी करते. या PMAY अनुदानाचा विशेषत: मध्यम उत्पन्न विभागावर प्रचंड आणि सकारात्मक परिणाम असतो. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
 2. सर्वांसाठी हाऊसिंग: प्रधान मंत्री आवास योजनेनुसार, शासन देशामधील शहरी क्षेत्रांदरम्यान 2 कोटी परवडणार्‍या घरांचे बांधकाम करणार आहे. त्या परवडणार्‍या घरांचे बांधकाम महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळ नाडू इ. सारख्या राज्यांमध्ये आधीच सुरू झाले आहे. या योजनेला भारत शासनाद्वारे घेतलेल्या एका मुख्य उपक्रमापैकी एक मानले जाऊ शकते, जी देशाच्या ग्रामीण भागामधील नागरिकांचे जीवनमान वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागत 60% लोकसंख्या राहत असल्याचे लक्षात घेऊन, सर्वांना आवश्यक सुविधेचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी आहे.
 3. राष्ट्राचा विकास: PMAY ही भारत शासनाद्वारे सुरू केलेल्या विविध योजनांपैकी एक आहे आणि ही योजना ग्रामीण भागामधील नागरिकांना मदत करेल. हा प्रकल्प केवळ कमी उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न क्षेत्रालाच बळकटी देणार नाही तर याचा त्याच्याशी संबंधित देशाच्या भूक्षेत्र उद्योगावरही फार परिणाम पडेल, उदाहरणार्थ, हे रोजगारच्या संधी उपलब्ध करेल.

इतर लाभ: ज्या महिला निम्न उत्पन्न गटामध्ये येतात त्यांना गृह योजना मिळवताना विशेष लाभ मिळतील. ही तरतूद विधवा, किन्नर, ज्येष्ठ्य सदस्य आणि अपंग व्यक्तींसाठी आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याच्या/तिच्या शारीरिक आरामासाठी तळ मजल्यावर फ्लॅट्स मिळू शकतात.

PMAY ची पात्रता:

PMAY

योजनेसाठी आवेदन करण्यापूर्वी, तरीही, त्याने/तिने ते अनुदान मिळवण्यासाठी पात्र आहेत किंवा नाही हे लक्षात घ्यावे. खालील घटक PMAY साठीची पात्रता निश्चित करतील.

 1. व्यक्तीच्या उत्पन्न श्रेणीवर आधारित, तो/ती EWS, LIG किंवा MIG श्रेणीमध्ये यायला हवेत. तरीही, जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न MIG गटासाठीच्या, प्रति वर्ष 18 लाख रुपये या उत्पन्न श्रेणीहून अधिक असेल, तर ते प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत लाभ मिळवण्यास अपात्र असू शकतील.
 2. करार किंवा मालमत्तेच्या कागदपत्रांवर महिलेचे नाव असावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ही एकतर एकल मालकी असावी, जेथे घर महिलेच्या मालकिचे असेल, किंवा ते बहुधा संयुक्त मालकीचे असावे, जेथे मालकांपैकी एक महिला असावी.
 3. PMAY हे केवळ नवीन मालमत्ता खरेदीसाठी उपलब्ध आहे. नमूद केलेल्या क्रेडीट लिंक्ड योजनेसाठी आवेदन करताना आवेदकाच्या नावे कोणत्याही इतर पक्क्या मालमत्ता नसाव्यात.
 4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना एकतर राज्य किंवा केंद्र शासनाकडून यापूर्वीच्या इतर कोणत्याही हाऊसिंग योजनांमधून कोणतेही केंद्र सहाय्य किंवा लाभ मिळालेले नसावेत.
 5. खरेदीसाठी असलेले घर किंवा मालमत्ता ही 2011 जनगणनेनुसार नगरे, गाव किंवा शहरांसारख्या किमान एकाचा भाग असावी.
 6. लाभार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही वित्तीय संस्थांकडून PMAY किंवा इतर क्रेडीट लिंक्ड अनुदान योजनेंतर्गत कोणतेही लाभ मिळवलेले नसावेत.
 7. जर गृह कर्ज मिळवण्याचे पहिले कारण हे आधीच विद्यमान मालमत्तेचे नुतनीकरण किंवा विस्तार हे असेल, तर नमूद केलेले काम हे प्राथमिक कर्ज हप्ता मिळल्यानंतर 36 महिन्यांच्या आत पूर्ण व्हायला हवे.

PMAYऑनलाईनसाठी आवेदन कसे करावे:

जर तुम्ही PMAY साठी पात्र असाल आणि PMAY साठी ऑनलाईन आवेदन करायचे हे शोधत असाल, तर खाली दिल्यानुसार टप्प्या टप्प्यांनी मार्गदर्शकाचे पालन करा.

   1. तुम्ही PMAY साठी पात्र होता ती श्रेणी ओळखा.
   2. मग अधिकृत वेबसाईटला भेट द्या: http://pmaymis.gov.in/
   3. मुख्य मेन्यूमध्ये ’नागरिक मूल्यांकना’ वर क्लिक करा आणि आवेदकाची श्रेणी निवडा.
   4. तुम्हाला वेगळ्या पानावर निर्देशित केले जाईल जेथे तुम्ही तुमचा आधार तपशील प्रविष्ट करावा.
   5. तुमची वैयक्तिक माहिती, उत्पन्न आणि बॅंकेचा तपशील आणि वर्तमान रहिवासाच पत्ता यांसह ऑनलाईन PMAY भरा.
   6. कॅप्चा कोड प्रविष्ट करा, अचूकतेसाठी तपशीलांचे सत्यापन करा आणि ते सुपुर्द करा.

तुम्ही ’नागरिक मूल्यांकना’ खाली ’तुमच्या मूल्यांकन स्थितीचा मागोवा घ्या’ वर क्लिक करून नंतर तुमच्या आवेदन स्थितीचा मागोवा घेऊ शकता.

PMAY साठी कशाप्रकारे ऑफलाईन आवेदन करू शकता:

जर तुम्ही ऑनलाईन वापरू शकत नसाल आणि आवेदन कसे करावे याचा शोध घेत असाल, तर PM आवास योजना ही ऑफलाईन आवेदनालाही समर्थन करते. फक्त राज्य शासनाद्वारे चालवल्या जाणार्‍या सामान्य सेवा केंद्राला भेट द्या आणि केवळ रु. 25 अधिक GST मध्ये आवेदन फॉर्म भरा. कोणतीही खाजगी केंद्रे किंवा बॅंकांना सहजपणे ऑफलाईन PMAY आवेदने स्वीकारण्याची परवानगी नाही.

 

हा लेख  WhatsApp. वर शेअर करा

 

Apply for a home loan

+91

Top Cities

* I declare that the information I have provided is accurate to the best of my knowledge. I hereby authorize Home First and their affiliates to call and/or send texts via SMS to me for promoting their products.