प्रधानमंत्री आवास योजना
Pushpanjali • November 12, 2024
Read this in Telugu, Hindi, Gujarati & English.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना अनेक फायदे देते. तुमच्या गृहकर्जाच्या व्याजावरील सबसिडी हे तुम्हाला पीएमएवाय (PMAY) द्वारे ऑफर केलेल्या सर्वोच्च लाभांपैकी एक आहे. तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केल्यास आणि योजनेअंतर्गत विहित केलेल्या कार्पेट क्षेत्राच्या निकषांची पूर्तता करणारे घर खरेदी केल्यास, तुमच्या गृहकर्जावर PMAY सबसिडीचा दावा करणे हा तुमच्या पात्रतेचा एक सोपा आधार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 कोटी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U) 2.0 ला मंजुरी दिली आहे. पुढील 5 वर्षांमध्ये शहरी ठिकाणी परवडणारी घरे बांधणे, खरेदी करणे किंवा भाड्याने देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या किमतीत सर्व हवामानासाठी पक्की घरे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून भारत सरकारने हा प्रकल्प राबविला आहे. प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U) योजनेने नागरिकांना यापूर्वीच 1.18 कोटी घरे बांधण्यात मदत केली आहे आणि शहरी भारतातील लाभार्थ्यांना 85.5 लाख घरे वितरित केली आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) याचा फायदा कोणाला होईल?
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) चे प्राथमिक लाभार्थी हे दुर्बल घटक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आहेत, ज्यांना अजूनही कायमस्वरूपी घराची गरज आहे. तथापि, विधवा, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती/जमाती, बांधकाम कामगार, झोपडपट्टीतील रहिवासी, अंगणवाडी सेविका इत्यादींवर विशेष लक्ष दिले जाईल.
पीएमएवाय (PMAY) 2.0 चे पात्रता निकष
पीएमएवाय (PMAY) – U 2.0 चा लाभ मिळवण्यासाठी काही पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत-
- देशात कोठेही तुमचे कायमस्वरूपी घर नसावे.
- ईडब्ल्यूएस (EWS) (आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट) कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- एलआयजी (LIG ) (कमी उत्पन्न गट) कुटुंबांसाठी वार्षिक उत्पन्न ₹3 लाख ते ₹6 लाखांच्या दरम्यान असावे.
- एमआयजी (MIG) (मध्यम उत्पन्न गट) कुटुंबांसाठी वार्षिक उत्पन्न ₹6 लाख ते ₹9 लाख दरम्यान असावे.
- तुम्हाला यापूर्वी कोणत्याही सरकारी गृहनिर्माण उपक्रमाद्वारे कोणतेही आर्थिक सहाय्य मिळालेले नसावे.
- अगोदरच बांधलेली घरे या योजनेत समाविष्ट केलेली नाहीत.
पीएमएवाय (PMAY) -U 2.0 अंतर्गत व्याप्ती
पीएमएवाय (PMAY) 2.0 अंतर्गत नागरिकांना लाभ देण्यासाठी कार्य करणारी क्षेत्रे येथे आहेत-
- बेनीफिशअरी लेड कन्स्ट्रक्शन (बीएलसी) (BLC) – ईडब्ल्यूएस (EWS) अंतर्गत, पात्र कुटुंबांना त्यांच्या उपलब्ध जमिनीवर नवीन घरे बांधण्यासाठी लाभ मिळतील.
- एफोर्डेबल हाउसिंग इन पार्टनरशिप (एएचपी) (AHP) – एएचपी (AHP) अंतर्गत, खरेदीदार जेव्हा खाजगी क्षेत्रातील प्रकल्पातून घर खरेदी करतात तेव्हा त्यांना रिडीमेबल हाउसिंग व्हाउचर दिले जातील. नवनवीन तंत्रज्ञान वापरून बांधकाम केले असल्यास, अतिरिक्त ₹1000 प्रति चौरस मीटर/युनिट प्रदान केले जातील.
- एफोर्डेबल रेंटल हाऊसिंग (एआरएच) (ARH) – ही एक अनोखी योजना आहे जी शहरी स्थलांतरित, विद्यार्थी, औद्योगिक कामगार, नोकरदार महिला इत्यादींना भाड्याच्या घरांची सुविधा प्रदान करेल. एआरएच (ARH) अल्पकालीन निवास शोधत असलेल्या आणि मालमत्तेची मालकी घेऊ इच्छित नसलेल्यांसाठी परवडणारी आणि आरोग्यदायी राहण्याची परिस्थिती सुनिश्चित करेल.
- व्याज अनुदान योजना (ISS) – या योजनेअंतर्गत, ईडब्ल्यूएस (EWS), एलआयजी (LIG ) आणि एमआयजी (MIG) कुटुंबांसाठी गृहकर्जावर सबसिडी दिली जाईल. या योजनेअंतर्गत, मालमत्तेचे कमाल मूल्य ₹35 लाखांपेक्षा कमी आणि कर्जाचे मूल्य ₹25 लाखांपेक्षा कमी असावे. या योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना 4% व्याज अनुदान दिले जाईल. ₹8 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज अनुदान पाच वर्षांच्या हप्त्यांमध्ये दिले जाईल.
Read more-