क्रेडीट स्कोअर कसा सुधारावा: क्रेडीट स्कोअर सुधारण्याचे 8 मार्ग?
•
तुमचा क्रेडीट माहिती अहवाल(CIR) हा कर्ज आवेदन प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो आणि त्यामुळे कमी स्कोअर असल्यास कर्ज आवेदनाच्या तुमच्या शक्यतांवर परिणाम होतो. त्यामुळे, जर तुमचा क्रेडीट इतिहास वाईट असेल आणि तुम्हाला तुमचा क्रेडीट स्कोअर वाढवण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे असलेले विकल्प तुम्हाला माहित असणे महत्वाचे असते. “क्रेडीट दुरूस्ती” कंपनीपर्यंत पोहोचणे आणि त्यांना मोठी रक्कम देणे हा साधा उपाय नाही. सिबिल (CIBIL) हे कोणत्याही क्रेडीट रिपेअर कंपनीशी संबंधित नाही.
तुमचा क्रेडीट स्कोअर-हा तीन अंकी क्रमांक असतो ज्याचा वापर सावकारांनी तुम्हाला क्रेडीट कार्ड किंवा कर्ज मंजूर केले तर तुम्ही त्याची परतफेड करण्याची किती शक्यता आहे याचा निर्णय घेण्यामध्ये मदत करतो-तुमचे आर्थिक जीवन लक्षात घेता हे फार महत्वाचे असते. तुमचे गुण जितके जास्त असतील, तुम्ही सर्वात अनुकूल अटींवर कर्जे आणि क्रेडीट कार्डासाठी पात्र होण्य़ाची शक्यता अधिक असते, ज्यामुळे तुमच्या पैशांची बचत होऊ शकते.
जर तुम्हाला तुमचा क्रेडीट स्कोअर बळकट करायचा असेल, तर तुम्ही करू शकता अशा अनेकविध गोष्टी आहेत. याला फार खूप कमी परिश्रम लागतात, आणि निश्चितपणे थोडा वेळ लागतो.
सुधारित क्रेडीट स्कोअर मिळवण्यासाठी येथे टप्प्या टप्प्यांनी मार्गदर्शक दिले आहे.
- तुमची बिले वेळेत भरा: जेव्हा सावकार तुमच्या क्रेडीट अहवालाचा आढावा घेतात, तेव्हा ते तुम्ही तुमची बिले किती विश्वसनीयरित्या भरता याबाबत चौकस असतात. त्यामुळे भूतकाळातील प्रदानांचे प्रदर्शन हे सामान्यत: भविष्यातील प्रदर्शनाचे प्रामाणिक सुचवणारे साधन म्हणून मानले जाते. तुम्ही दर महिन्याला मंजूर केल्याप्रमाणे वेळेवर तुमची सर्व बिले प्रदान करणे या क्रेडीट स्कोअरींग घटकावर सकारात्मकरित्या प्रभाव टाकू शकता. उशीरा प्रदान करणे किंवा तुम्ही प्रदान करण्य़ास मंजूरी दिलेल्यापेक्षा कमी प्रदान करून खात्याचा निपटारा केल्यास तुमच्या क्रेडीट स्कोअर्सवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- तुमच्या क्रेडीट कार्डाची शिल्लक काढून टाका: तुम्ही कराल अशी दुसरी गोष्ट म्हणजे क्रेडीट कार्ड शिल्लकी काढून टाकणे. तुम्ही बिलिंग तारखेच्या आत परतफेड करू शकता अशीच रक्कम खर्च करावी. शिल्लक म्हणजे, तर कर्ज आणि इएमआयज(EMIs) वरील प्रदान न केलेली रक्कम. तुमच्या सावकारासोबत तपासा आणि न भरलेली थकीत रक्कम भरून तुमचे खाते समाप्त करण्यासाठी वाटाघाटी करा. क्रेडीट कार्डावरील अशी न भरलेली रक्कम किंवा शिलकी या तुमचा स्कोअर खाली आणतात. ही रक्कम प्रदान केल्यास तुमच्या सिबिल (CIBIL) किंवा क्रेडीट स्कोअरवर सकारात्मक परिणाम होतो. आणखी केवळ एक किंवा दोन क्रेडीट कार्ड्स राखलेले उत्तम असते ज्यामुळे तुम्हाला परतफेडीचा मागोवा तपासणे सोपे होते.
- क्रेडीट परिपूर्ती गुणोत्तर तपासा: तुम्ही खरेदी करता ते सर्वकाही खरेदी करण्यासाठी क्रेडीट कार्डाचा वापर करणे जरी भपकेदार वाटत असले, तरी यामुळे तुम्हाला एक दोन रिवॉर्ड गुण/कॅशबॅक मिळवून देते. पण क्रेडीट वापर गुणोत्तर हे तुमच्या कार्डावर उपलब्ध असलेल्या क्रेडीट मर्यादेच्या 30% च्या आत किंवा कमी असल्याची खात्री करा. या नियमाचा तुमचा क्रेडीट स्कोअर वाढवण्यास आणि त्याचे व्यवस्थापन करण्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कमी शिल्लक असलेला क्रेडीट कार्ड वापर इतिहास आरोग्यकारक सिबिल (CIBIL) दर्शवतो.
- बॅंकेसोबत कनेक्ट व्हा: जर तुम्ही कठीण टप्प्यामधून जात असाल आणि तुम्ही वेळेत तुमची कर्जे/क्रेडीट कार्डाची बिले भरू शकत नसाल, तर फक्त गप्प राहू नका. तुम्ही बॅंकेला सहज भेट देणे आणि त्यांना तुम्ही वेळेत हप्ते का देऊ शकत नाही हे जाणण्यासाठी त्यांना तुमच्या कष्टाची माहिती द्या. जर तुमचे बॅंकेसोबत चांगले, चांगल्याप्रकारे राखलेले नातेसंबंध असतील, तर बॅंक तुमच्या स्थितीचे विश्लेषण करेल आणि तुम्हाला प्रदानांना पुढे ढकलून स्थगिती देऊ शकतात. बॅंक तुमच्या क्रेडीत स्कोअरवर परिणाम करणार नाही अशाप्रकारे वगळलेल्या प्रदानाध्ये समायोजने करू शकते.
- अचूकतांचे विश्लेषण करा: तुमची आर्थिक वर्तणूक ही नेहमी तुमच्या कमी क्रेडीट स्कोअरचे स्पष्टीकरण असू शकत नाही. तुमच्या क्रेडीट इतिहास माहितीमध्येही त्रुटी असू शकतात ज्यामुळे अहवालामध्ये स्कोअर कमी दिसू शकतो. चूकांसाठी तुमच्या सिबिल (CIBIL) अहवालाची तपासणी करा; जर तुम्हाला काही आढळले, तर तुम्ही त्याला प्रतिकार करू शकता. अधिकारी तपशीलांचे सत्यापन करतील आणि तुमच्या अहवालामध्ये आवश्यक बदल करतील. तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये त्रुटी किंवा वगळलेला/ अतिरिक्त व्यवहार हा स्कोअरला चूकीच्या मार्गावर नेऊ शकतात.
- कोणत्याही क्रेडीट कार्डाचा त्याग करू नका: वेळेसोबत, तुम्ही आधुनिक क्रेडीट कार्ड खरेदी करता आणि तुमच्याकडे आधी होते ते मुलभूत कार्ड वापरण्याचे थांबवता. क्रेडीट कार्ड वापरले जात नसल्यामुळे ते खाते बंद करणे योग्य आहे असे काही लोकांना वाटते. तरीही, या निर्णयाचा तुमच्या क्रेडीट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. क्रेडीट श्रेणीकरण एजंसीज आणि सावकार तुम्ही भिन्न क्रेडीट लाईन्स व्यवस्थापित करू शकत नाहीत असा अंदाजे बांधतात. त्यामुळे एक विधी म्हणून तुमच्या कडे असलेली कार्ड्स चालू ठेवण्य़ासाठी व्यवहार करण्याची शिफारस केली जाते. तुम्ही व्यवस्थापित करत असलेल्या क्रेडीट सुविधांची रक्कम आणि प्रकार हे तुमचा क्रेडीट स्कोअर सुधारण्यामध्ये महत्वाचे असते.
- तुमचे मित्र किंवा नातलगांना मदतीची विचारणा करा: तुमच्या क्रेडीट इतिहासाची लांबी ही तुमच्या क्रेडीट स्कोअरमध्ये मोठे काम करते. FICO हे तुमच्या जुन्या खात्याचे वय आणि तुमच्या सर्व खात्यांचे सरासर वय यांसारख्या घटकांवर तुमचे 15% क्रेडीट स्कोअर अवलंबून असतात. जितके जुने ते उत्तम असते. अनेक बाबतीत, तुम्हाला फक्त बसून, तुमचे क्रेडीट स्कोअर या श्रेणीमध्ये सुधारण्याची वाट पहावी लागते. तरीही तुम्हाला चांगल्याप्रकारे व्यवस्थापित क्रेडीट कार्ड खात्यासह कोणी प्रिय व्यक्ती भेटल, तर तुम्ही आमंत्रित करण्यास तयार रहावे. जर परिचय असलेल्या व्यक्तीने किंवा नातेवाईकाने तुम्हाला परवाना वापरकर्ता म्हणून विद्यमान क्रेडीट कार्डामध्ये समाविष्ट केले, तर हे तुमचा क्रेडीट इतिहास वाढवण्यास मदत करते. खाते हे चांगल्या स्थितीमध्ये आहे असे गृहित धरून, परवाना असलेला वापरकर्ता बनल्यास यामुळे ते खाते जेव्हा तुमच्या रिपोर्टवर दाखवले जाते तेव्हा त्यामुळे तुमचा क्रेडीट स्कोअर सुधारू शकतो.
- तळ ओळ: तुम्हाला एका रात्रीत आदर्श 850 इतका क्रेडीट स्कोअर मिळू शकत नाही. पण प्रत्येक पाऊल योग्य दिशेने टाकल्यास त्यामुळे लाभ मिळू शकतात. तुम्ही वाईट क्रेडीट ते चांगले क्रेडीट ते उत्तम क्रेडीट कडे प्रगती करता, तसे तुम्ही भरपूर पैशांची बचत करता आणि तुम्हाला अनेकविध संधींचा लाभ मिळतो. उत्कृष्ठ स्कोअर मिळवणे आणि राखण्याची सोपी पध्दत म्हणजे चांगल्या दीर्घ कालीन क्रेडीट सवयी विकसित करणे. तुमच्या शिलकी वेळेत देणे, कमी वापर दर राखणे, आणि तुम्हाला आवडलेल्या क्रेडीटसाठीच आवेदन करणे. जर तुम्ही या महत्वाच्या नियमांचे पालन केले, तर तुमचा स्कोअर कालांतराने वाढतो.
हा लेख व्हॉट्सअॅप वर शेअर करा