गृह कर्जाची पात्रता: तुमची गृह कर्जाची पात्रता वाढवण्यासाठी टिपा
•
तुम्ही गृह कर्जासाठी पात्र आहात का? गृह कर्जासाठी आवेदन करण्यापूर्वी प्रत्येक कर्ज आवेदकाकडे या प्रश्नाचे उत्तर नसते. क्रेडीट मिळवणे किंवा कर्ज मंजूर करून घेणे हे साधे काम नाही, कारण याला ऑफर केलेल्या कर्जाबाबत योग्य संशोधन करणे आणि पूर्ण माहिती असण्याची गरज असते. त्यामुळे, गृह कर्जासाठी आवेदन करण्यापूर्वी तुमच्या गृह कर्ज पात्रता पाहण्याची शिफारस केली जाते.
गृह कर्ज पात्रता म्हणजे का?
गृह कर्ज पात्रता ही अशी संकल्पना असते जी तुम्हाला घर घेताना कर्जाची किती रक्कम मिळेल आणि तुम्ही कर्जासाठी पात्र आहात किंवा नाही हे दर्शवते. तुमच्या गृह कर्जाची पात्रता निश्चित करताना काही घटक लक्षात घेतले जायला हवे ज्यामध्ये आवेदकाचे वय, उत्पन्न, रोजगार आणि मालमत्तेचा प्रकार, क्रेडीट स्कोअर आणि अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.
होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर:
गृह कर्ज पात्रता कॅल्क्युलेटर हे तुम्ही मिळवू शकता अशा कर्जाच्या रकमेचा अंदाज पुरवणारे ऑनलाईन साधन आहे. गृह कर्जासाठी आवेदन करण्यापूर्वी, तुम्ही ज्यासाठी पात्र आहात अशी रक्कम जाणल्यास कर्ज मंजूरीची शक्यता वाढवण्यास मदत होते. उत्पन्न आणि परतफेड क्षमतेच्या आधारावर हे कॅल्क्युलेटर त्वरित परिणाम पुरवते, ज्याचे निश्चित मासिक जबाबदारी, वय इ.सारख्या तपशीलांचा वापर करून मूल्यांकन केले जाते. तरीही, कर्जाची विनंती मंजूर करण्यापूर्वी, सावकार संस्था क्रेडीट स्कोअर, आर्थिक स्थान इ. सारख्या अनेक इतर घटक लक्षात घेतात.
तुमच्या गृह पात्रतेची गणना कशी केली जाते?
बॅंक ही तुम्हाला तुम्ही परतफेड करू शकता इतकीच रक्कम कर्जाऊ देते. तुमच्या कर्जाची पात्रता निश्चित करताना, बॅंका तुम्ही इएमआय (EMI) भरू शकता का हे विचारात घेते. बॅंकेकडे निश्चित जबाबदार्यांस उत्पन्न गुणोत्तर (FOIR) मर्यादा असते. तुमची महिन्यासाठीची निश्चित जबाबदारी (विचारार्थ केलेल्या कर्जासाठी समाविष्ट केलेले सर्व EMIs) ही तुमच्या निव्वळ कमाईच्या विशिष्ट टक्क्यांहून अधिक असू नये असा यामागचा विचार असतो.
FOIR = निश्चित जबाबदारी ÷ निव्वळ उत्पन्न
प्रत्येक बॅंकेकडे भिन्न मर्यादा असते. ती 40% ते 50% पर्यंत या श्रेणीमध्ये असते. बॅंका तुम्हाला असे कर्ज ऑफर करत नाही त्यांचे EMI तुमच्या निव्वळ मासिक उत्पन्नाच्या कडेच्या टक्केवारीचे उल्लंघन करते. त्यामुळे, जर तुमचे निव्वळ मासिक उत्पन्न रु. 50,000 असेल आणि FOIR हे 50% असते, तुम्हाला दरमहा रु. 25,000 EMI असलेले कर्ज मिळणार नाही.
तुम्ही घराचे भाडे यांसारख्या इतर निश्चित जबाबदार्याही सादर करू शकता. जर बॅंकेने भाड्याला निश्चित जबाबदारी म्हणून मानले, तर मर्यादा ही बहुधा जराशी उच्च असते.
गृहकर्ज पात्रतेची गणना करा
तुमच्या गृह कर्जाची पात्रता सुधारण्यास मदत करणारे घटक:
- चांगला परतफेड इतिहास
- स्थिर वित्तीय इतिहास
- कोणतेही कर्ज किंवा क्रेडीट कार्ड थकबाकी नसणे
- 750 च्या वर क्रेडीट स्कोअर
- नियमित उत्पन्न
- सह आवेदक म्हणून कार्यकारी जोडीदार
- कमी क्रेडीट उपयोगीता गुणोत्तर
- कमी अवलंबून असलेले लोक
तुमच्या गृह कर्जाची पात्रता वाढवसाठी काही मार्ग आहेत. तुमची गृह कर्जाची पात्रता मोठ्या प्रमाणात सुधारण्यासाठी कोणीही किंवा त्या पध्दतींचे एकत्रिकरण तुम्हाला सहाय्य करू शकते:
- तुमचे उत्पन्न वाढवा: स्पष्टपणे, हे बहुधा अत्यंत स्पष्ट उत्तर आहे, तरीही हे सोपे नाही. तुम्ही जितकी अधिक रोख निर्माण कराल, तितकी तुमची कर्जाची पात्रता अधिक असेल. जर तुम्हाला उत्पन्न निर्मिती करणारी मालमत्ता मिळाली, तर तुम्ही त्यांचा वापर कराल. उदाहरणार्थ, तुमच्याकडे दुसरे घर असेल पण ते भाड्यावर दिलेले नसल्यास, तुम्ही ते भाड्याने देण्याचे विचारत घ्या. हे उत्पन्न तुमच्या आय कर परताव्यामध्येही दाखवले जायला हवे.
- दीर्घ कालावधीचा विकल्प निवडा: जेव्हाही तुम्ही कर्जाचा कालावधी वाढवता, तेव्हा तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी बराच दीर्घ कालावधी आहे हे सावकाराला माहित असते त्यामुळे याकडे त्यांचा कल होतो त्यामुळे तुमच्या गृह कर्ज पात्रतेमध्येही वाढ होते. त्यामुळे वेळेवर कर्ज परतफेडीची शक्यता वाढते. दीर्घ कालावधी असलेली कर्जे फेडण्यासाठी कर्जदाराला अतिरिक्त वेळ लागतो, ज्यामुळे वेळेत प्रदान केले जाते आणि सावकाराची जोखीम कमी होते.
- विद्यमान कर्जे देऊन टाका: सर्व विद्यमान कर्जे देऊन टाकल्यास तुमचे कर्ज मंजूर करून घेण्याच्या शक्यता सुधारतात. तुम्ही कर्जाचे आवेदन केल्यानंतर तुमची कोणतीही विद्यमान कर्जे किंवा थकबाकी नसल्याची खात्री करा. तुम्ही अवेदन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमचे क्रेडीट कार्ड कर्ज तसेच तुमचे वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्ज देऊन टाका. तुम्ही नियमितपणे क्रेडीट कार्ड वापरत असाल, तुम्हाला तुमच्या क्रेडीट कार्ड खर्चांवर कोणतेही व्याज देण्याची गरज पडणार नाही अशाप्रकारे तुमचे क्रेडीट कार्डाचे संपूर्ण कर्ज वेळेत देऊन टाकण्याची सवय ठेवा. गृह कर्जांसाठी आवेदन करताना कर्ज मुक्त असलेल्या कर्जदारांना कर्ज मंजूर होण्याच अधिक शक्यता असते.
- तुमच्या अस्थिर प्रदानाची नोंद ठेवा: गृह कर्जासाठी तुमची पात्रता वाढवण्याची दुसरी पध्दत म्हणजे तुमच्या उत्पन्न कागदपत्रांसह तुमच्या अस्थिर प्रदानांचा पुरावा पुरवणे. अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांना मासिक लाभांश आणि बोनसेस पुरवतात, ज्यामुळे वार्षिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते. याला अनेकदा अस्थिर प्रदान म्हणून संबोधले जाते. तुमच्या कर्जाच्या पात्रतेची गणना करताना सावकार तुमचे अस्थिर प्रदान लक्षात घेतात त्यामुळे त्याची नोंद ठेवा.
- तुमचा क्रेडीट स्कोअर सुधारा: तुमच्या गृह कर्जाच्या पात्रता निकषांचे मूल्यांकन करताना सर्व सावकार तुमचा क्रेडीट स्कोअर लक्षात घेतात आणि तुम्हाला तुमचा क्रेडीट स्कोअर्स पुरवण्याची गरज असते. कर्जासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला कधीकधी 750 इतका क्रेडीट स्कोअर असणे गरजेचे असते. जर तुमचा क्रेडीट स्कोअर 750 पेक्षा कमी असेल, तर तुमचे कर्ज बहुधा नकारले जाते. तुमच्या क्रेडीट कार्डाविरुध्द निश्चित केलेल्या खर्च मर्यादेच्या केवळ 30% चा क्रेडीट वापर गुणोत्तर राखून विद्यमान कर्जे देऊन टाकल्यास तुम्ह तुमचे क्रेडीट स्कोअर सुधारू शकता. आणखी, सर्व EMI आणि क्रेडीट कर्जे वेळेत देऊन टाका. चांगले क्रेडीट परतफेड वर्तणूक तुमच्या कर्जाची पात्रता चांगल्याप्रकारे वाढवू शकते.
- संयुक्त गृह कर्जाची निवड करा: तुमच्या गृहकर्जाची पात्रता वाढवण्याच्या साध्या पध्दतींपैकी एक म्हणजे संयुक्त गृह कर्जाचा वापर करणे. रोजगारीत असलेल्या इतर आवेदकासोबत कर्जाचे आवेदन केल्यास आणि मासिक उत्पन्न दाखवल्यास, तुमचे कर्ज मंजूर होण्याचा शक्यता फार वाढतात. तुम्ही एकदा संयुक्त कर्ज निवडले, तर सावकार दोन्ही आवेदकांचे उत्पन्न लक्षात घेतात. तुम्हाला कर्जाची चांगली रक्कम मिळते.
- घाबरू नका किंवा घाई करू नका: गृह कर्जाला आवेदन करताना घाबरू नका किंवा घाई करू नका. गृह कर्जासाठी आवेदन करण्यापूर्वी योग्य संशोधन आणि वेळ आवश्यक असते. तुमच्या अंर्थसंखल्पाचा अंडाअज घ्या, तुमची कमाई किंवा उत्पन्नाची गणना करा, त्रुटींसाठी तुमचा सिबिल तपासा, कर्जाच्या विकल्पांची तुलना कर,व्याजाचा निश्चित किंवा चल व्याज दर निवडा आणि गृह कर्जासाठी आवेदन करण्यापूर्वी किमान अतिरिक्त शुल्कांसह आवश्यक व्याज दर निवडा.
गृह कर्ज घेणे हा एखाद्याच्या जीवनामधील सर्वांत कठीण आणि सर्वांत दीर्घ वित्तीय निर्णयांपैकी एक असतो. त्यामुळे, हे सामान्य टप्पे विचारात घेऊन तुम्हाला तुमची गृह कर्जाची पात्रता वाढवण्यास मदत होते आणि तुम्हाला हवे असलेले घर खरेदी करण्यास सहाय्य होते.
हा लेख WhatsApp. वर शेअर करा