घर बांधकामाच्या कर्जाचा विचार करत आहात? आताच आवेदन करा!

rimzim March 15, 2021

तुमचे इन-डोर स्विमिंग पूल्स आणि मल्टी-कार गॅरेजेससह असणारे घर मिळवण्याचे स्वप्न आहे का? तुम्ही कधी तुमचे विद्यमान घर बांधणे किंवा त्यामध्ये अतिरिक्त बेडरूम जोडण्याचा कधीही विचार केला आहे का? तुम्ही हे स्वप्न अस्तित्वात आणू शकता, कारण बॅंका बांधकामाचा खर्च व्याप्त करण्यासाठी लघु कालावधी क्रेडिट पुरवतात. घराचे बांधकाम हा मनोरंजक अनुभव ठरू शकतो पण ही खर्चिक प्रक्रियाही होऊ शकते. बहुतांश लोक घराच्या बांधकामाचा खर्च पेलू शकत नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी, अनेक बॅंका आणि वित्तीय संस्था घर बांधकामाच्या कर्जाचा रूपात आर्थिक मदत प्रदान करतात.

घर बांधकामाच्या कर्जा काय असते?

घर बांधकाम कर्ज हे लहान कालावधीचे कर्ज असते जे इमारतीच्या बांधकामाचे प्रदान करण्यासाठी वापरले जाते. हे असे गृह कर्ज असते जेथे तुम्हाला घर खरेदी करण्याऐवजी स्वत:चे घर बांधण्यासाठी कर्ज मिळते. जसे जसे काम होत जाते, तसे कर्ज विशेषज्ञ टप्प्यामध्ये पैसे देतो. जर तुम्हाला गृह बांधणी कर्जासाठी आवेदन करायचे असेल, तर तुमच्याकडे विशेषज्ञाला बांधकाम योजना आणि बांधकामासाठी व्यवहार्य अंदाजपत्रक योजनेसह तपशीलवार बांधकाम वेळापत्रक योजना देण्याची गरज असते.

घर बांधकामाच्या कर्जाचे प्रकार:

  1. कायमच्या घराचे बांधकाम: तुमच्याकडे सकारात्मक बांधकाम योजना आणि तपशिलवार बांधकाम वेळापत्रक तयार असल्यास ही कर्जे स्वीकार्य असतात. याबाबतीत, काम पूर्ण होत असताना बॅंक बिल्डरला पैसे देते. मग तो खर्च समाप्तीच्या वेळी गृह कर्जावर बदलली जाते. याप्रकारचे कर्ज तुम्हाला समाप्तीच्या वेळी व्याज दर लॉक करू देते, जे सुसंगत हप्त्यांमध्ये दिले जातात.
  2. फक्त बांधकाम कर्जे: प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर फक्त बांधकाम कर्जांचे प्रदान केले जाते. जर तुमच्या हातात भरपूर रोख असेल किंवा जुन्या घराच्या विक्रीमधून मिळणारा एकूण खर्च हा नवीन बांधलेल्या घरामधून व्याप्त होईल असे तुम्हाला माहित असेल, तर हे कर्ज तुमच्यासाठी असते.
  1. नुतनीकरण बांधकाम कर्ज: या प्रकारचे कर्ज हे इतर दोन गृह बांधणी कर्जांपेक्षा वेगळे असते. तुम्ही आधीच रहात असलेल्या घराचे नुतनीकरण करायचे असेल किंवा त्यामध्ये सुधारणा करायची असेल तर याप्रकारच्या नुतनीकरण बांधकाम कर्जाचा वापर केला जातो. येथे, खरेदी किमतीसह नुतनीकरणाचा अपेक्षित खर्च व्याप्त केला जातो.

गृह बांधणी कर्जाचे मुख्य लाभ:

येथे काही महत्वाचे लाभ दिले आहे:

  1. याचा व्याज दर फार आकर्षक असतो.
  2. 30 वर्षांचा दीर्घ कालावधी.
  3. गतिमान मंजूरी प्रक्रिया
  4. उच्च कर्ज ते मूल्य गुणोत्तर हे बांधकाम अंदाजपत्रकाच्या 100% किंवा मालमत्तेच्या मूल्याच्या 90%, जे कमी असेल ते असते.

आवश्यक कागदपत्रे:

येथ गृह बांधकामासाठी आवश्यक काही महत्वाच्या कागदपत्रांची सूची दिली आहे.

  1. नवीनतम पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह पूर्णपणे भरलेला आवेदन फॉर्म.
  2. वयाचा पुरवा
  3. पत्त्याचा पुरावा
  4. उत्पन्नाचा पुरावा किंवा बॅंकेचे विवरण
  5. मालमत्ता किंवा प्लॉटशी संबंधित कागदपत्रे
  6. बांधकम खर्चाचा अंदाजित कोट

गृह बांधकाम कर्जासाठी आवेदन करा:

गृह कर्ज बांधकाम प्रक्रिया ही गृह कर्जासारखीच असते. परवडणारे EMIs तपासण्यासाठी नेहमी गृह कर्ज EMI कॅल्क्युलेटरचा वापर करा. होम फर्स्ट फायनान्स कंपनी तुम्हाला परवडणार्‍या व्याज दरामध्ये तुमच्या स्वप्नातील घर बांधण्यास मदत करते.

काही टप्प्यांचे पालन करून तुम्ही होमफर्स्ट्मध्ये गृह बांधणी कर्जासाठी ऑनलाईन आवेदन करू शकता:

  • होम फर्स्ट वेबसाईटवर गृह बांधकाम कर्ज पृष्ठाला भेट द्या.
  • सर्व आवश्यक तपशीलांसह आता आवेदन करा फॉर्म भरा.
  • प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी दारामधून कागदपत्र पिकअपची व्यवस्था करू.

गृह बांधणी कर्जासाठी आवेदन करण्यापूर्वी, नंतरच्या टप्प्यामध्ये कोणताही गोंधळ टाळण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे तपासा.

तुमच्या मालमत्तेवर घर बांधत आहात? किंवा आणखी एक मजला जोडत आहात? कारण काहीही असो, होमफर्स्ट तुम्हाला तुमचे घर अधिक सुंदर बनवण्यासाठी कर्ज देते.

हा लेख  WhatsApp. वर शेअर करा

Spread the knowledge

This website doesn't
support landscape mode !

Please rotate your device to portrait mode
for the best experience.