तुम्हाला महिलांच्या गृह कर्जाविषयी माहित असावे असे सर्व
•
घर खरेदी करणे हा आपल्यापैकी अनेकांसाठी जीवनभराचा आणि भावनिक निर्णय असतो ज्यासाठी आपल्या बचतीपैकी बहुतांश भाग कामी लागतो, आपल्याला पैसे कर्जाऊ घ्यावे लागतात आणि आपल्यावर अनेक वर्षांसाठी टीकणार्या मासिक परतफेडीची जबाबदारीही येते. वित्तीय संस्थांसोबत व्याज दर आणि प्रक्रिया शुल्काची वाटाघाटी करताना आपण अनेकदा खर्चाची बचत करण्याची संधी विसरतो जी अगदी आपल्या डोळ्यांसमोर असते. प्रत्येक गृह कर्ज घेणार्याच्या मुख्य चिंतांपैकी एक म्हणजे उच्च कर्ज रकमेसाठी पात्र ठरणे ज्यामुळे व्यक्ती त्याच्या स्वप्नाचे घर निवडू शकतो आणि गृह कर्ज लवकर मंजूर आणि वितरीत होऊ शकते. सुदैवाने, व्यक्ती केवळ विशिष्ट प्रमाणात या चिंता कमी करण्याकडे पाऊल उचलू शकतात, आणि त्याचवेळी ते भरपूर लाभही मिळवू शकतात. महिलांसाठी गृह कर्ज हे याचे उत्तर आहे.
आधुनिक काळामध्ये, महिला या घर खरेदीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महत्वाचा भाग बनल्या आहेत. मोठ्या संख्येने महिला आता पूर्ण वेळ नोकर्या/व्यवसाय करत आहेत आणि त्या उपजीविकेसाठी आता त्यांचे जोडीदार किंवा वडिलधार्यांवर अवलंबून नसतात. त्यामुळे, त्यांच्यापैकी बर्याच जणी त्यांच्या नवर्यांसोबत गृह कर्जामध्ये आर्थिकरित्या योगदान देतात. महिलेद्वारे गृह कर्ज घेतल्यास त्याचे अनेक फायदे असतात. त्यामुळे गृह कर्ज घेताना कर्जदार म्हणून महिलेला समाविष्ट करणे हा शहाणपणाचा निर्णय का असतो याबबत आपण काही महत्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया.
महिलांच्या फायद्यासाठी गृह कर्ज:
- उच्च कर्ज पात्रता: कमवणार्या महिला या त्यांच्या जोडीदारासह सह-आवेदक म्हणून आवेदन करू शकतात. यामुळे त्यांना त्यांच्या गृह कर्जाची पात्रता वाढवण्याच्या बाबतीत लाभ मिळू शकतो जे शेवटी नवीन घराची निवड करताना त्यांना अत्यंत लवचिकता देते.
- उत्पन्न कर लाभ: सारख्या संयुक्त गृह कर्जावर पती आणि पत्नी दोघांना मुद्दल तसेच व्याजाच्या गृह कर्ज परतफेडीवर कर वजावटीचा लाभ उपलब्ध असतो. वैयक्तिकरित्या, दोघेही मुद्दलीवर (कलम 80C अंतर्गत) रु. 5 लाखांची आणि व्याजावर रु. 2 लाख (कलम 24 अंतर्गत) इतकी कमाल वजावट मिळवू शकतात. त्याद्वारे जोडपे म्हणून, एकत्रितपणे ते इएमआय(EMI) चे घटक असलेल्या मुद्दलीवर (कलम 80C अंतर्गत) रु. 3 लाखांची आणि व्याजावर रु. 4 लाखांची वजावट मिळवू शकतात, ज्यामुळे आय करामध्ये लक्षणियरित्या बचत करून देते.
- कमी स्टॅम्प ड्युटी: मालमत्ता खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी शुल्कांचा विचार केल्यास पुरूषांपेक्षा महिलांसाठी फार लाभदायक असते. अनेक राज्य शासने महिलांच्या गृह मालकीला प्रोत्साहन देऊन त्याद्वारे त्यांच्या पुरूष जोडीदारापेक्षा 1-2% कमी शुल्क आकारतात, रु. 30 लाख किमतीच्या मालमत्तेची मालकी असलेली महिला गृह मालक सहजपणे रू. 30,000 ते रू. 60,000 ची बचत करू शकते.
- गृह कर्ज मंजूरीच्या उच्च संधी: अनेक वित्तीय संस्थांच्या भूतकाळामधील कलांनी सूचित केले आहे की पुरूषांशी तुलना करता, महिला या नित्याच्या बचतकर्त्या असतात, ते अनावश्यक कर्ज टाळतात, त्या घरगुती अर्थ व्यवस्थापनामध्ये फार विवेकी असतात आणि कर्ज घेण्याच्या बाबतीत त्यांचा ऐतिहासिकपणे कर्तव्य चूक करण्याचा दर कमी असतो.
- प्रधान मंत्री आवास योजना (PMAY): PMAY अंतर्गत, समुदायाच्या EWS, LIG, किंवा MIG विभागाशी संबंधित घराचे मालक हे गृह कर्जाच्या मुद्दल रकमेवर रु. 67 लाखांचे शासकिय अनुदान मिळवण्यास पात्र असतात.
PMAY मिळवण्यामधील मुख्य सावधानता म्हणजे महिला ही एकतर मालमत्तेची एकल किंवा संयुक्त मालक असायला हवी.
महिलांसाठी गृह कर्जाच्या पात्रता:
वित्तीय संस्थांसाठी व्यक्तीला गृह कर्ज मंजूर करण्यासाठी, तिने त्यांच्याद्वारे नमूद केलेले विशिष्ट निकष पूर्ण करणे गरजेचे असते. होमफर्स्टच्या बाबतीत, महिलांसाठी गृह कर्जाच्या पात्रतेचे निकष अल्प आणि साधे आहेत:
✔ती भारताची नागरिक असावी
✔तीचे वय 20 वर्षांच्या वर आणि 60 वर्षांच्या खाली असायला हवे
✔तिला किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा
✔क्रेडीट स्कोअर हा 650 किंवा त्यावर असायला हवा
✔मासिक कौटुंबिक उत्पन्न हे रु. 15,000 किंवा त्याहून जास्त असायला हवे
वर नमूद केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त, गृह कर्ज पात्रता कॅल्क्युलेटरचा वापर करून अचूक गृह कर्ज पात्रतेची गणना केली जाऊ शकते.
महिलांसाठी गृह कर्जाच्या बाबतीत वर नमूद केलेल्या लाभांनुसार ते घर खरेदी करण्याशी संबंधीत खर्चांमध्ये थोडी बचत करण्यामध्ये मदत होते आणि त्यामुळे संपूर्ण गृह कर्ज मंजूरीच्या प्रक्रियेला गती मिळते. मुख्य आवेदक किंवा सह-आवेदक म्हणून पत्नीला समाविष्ट केल्यास केवळ व्यक्तीवरील गृह कर्जाचे ओझेच कमी होत नाही तर यामधून महिला सशक्तीकरण करण्याकडे मोठे पाऊल उचलले जाते.
त्यामुळे, घर खरेदी करण्याची योजना करत असलेल्या महिला, महिलांसाठीच्या गृह कर्ज योजनेचा चांगला लाभ घेऊ शकतात आणि तुमच्या स्वप्नांच्या जवळ पोहचण्यासाठी पाऊल उचलू शकता!
हा लेख WhatsApp वर शेअर करा